महापालिकेवर भगवा फडकणारच - निम्हण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - "मतदारांचा निश्‍चय पक्का झाला आहे. मतदानाच्या माध्यमातून हे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकणारच,' असा विश्‍वास शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी बुधवारी व्यक्त केला.

पुणे - "मतदारांचा निश्‍चय पक्का झाला आहे. मतदानाच्या माध्यमातून हे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकणारच,' असा विश्‍वास शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी बुधवारी व्यक्त केला.

महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आणि 162 जागांपैकी 156 जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले. बंडखोरीला आळा घालण्यात काही प्रमाणात पक्षाला यश आले. त्यामुळे अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत बंडखोरीचे प्रमाणही कमी होते. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण झाला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर निम्हण यांनी हा दावा केला.

ते म्हणाले, 'गेली अनेक वर्षे शिवसैनिकांवर भाजपचे ओझे होते. त्यामुळे युती नको अशी सामान्य शिवसैनिकांची भूमिका होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवर विश्‍वास दाखवत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. तो सार्थ ठरविल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत.''

आज दिवसभर शिवसैनिकांमध्ये हा विश्‍वास दिसत होता. मतदारांमध्येही शिवसेनेला एक संधी दिली पाहिजे, ही भावना दिसून येत होती. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्‍वास वाटतो, असेही निम्हण म्हणाले.

Web Title: bhagava on municipal