भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग- डॉ. जॉयदीप बागची 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

"भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक भाग आहे'', असे मत जर्मनीतील म्युनिच युनिव्हर्सिटीत व्याख्याते डॉ. जॉयदीप बागची यांनी व्यक्त केले.

पुणे- "भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग नाही, असा अनेक विचारवंत, संशोधकांच्या वादातीत मांडणीला कोणताही आधार नाही. त्यामुळे भगवद्‌गीता हा महाभारताचाच एक भाग आहे'', असे मत जर्मनीतील म्युनिच युनिव्हर्सिटीत व्याख्याते डॉ. जॉयदीप बागची यांनी व्यक्त केले.

सावरकर अध्यासनात विवेक व्यासपीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत व प्राच्यविद्या विभागातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. "जर्मन इंडॉलॉजी, संस्कृत अँड हिस्टरी ऑफ हिंदुइजम' या विषयावर हे व्याख्यान सादर झाले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही देशातील एक नामांकित संशोधन संस्था असून, तिथे अनेक विचारवंत, अभ्यासकांनी मोठं काम केलं आहे. आज मात्र ती प्रथा फार पुढे जाताना दिसत नाही, अशी खेदजनक टिप्पणी बागची यांनी केली. भांडारकर संस्थेअंतर्गत विष्णू सीताराम सुखटणकर यांनी महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीसाठी केलेल्या कामाच्या व संशोधन, मांडणीच्या अनेक आठवणी या निमित्ताने बागची यांनी सांगितल्या.

Web Title: Bhagavad Gita is part of Mahabharata says Dr Joydeep Bagchi