मुळशीच्या तरुणाकडून एव्हरेस्ट शिखर सर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पिरंगुट - मुळशी तालुक्‍यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या लव्हार्डे येथील भगवान भिकोबा चवले यांनी आज (ता. १७) सकाळी हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर करून मुळशीचा झेंडा फडकवला. 

पिरंगुट - मुळशी तालुक्‍यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या लव्हार्डे येथील भगवान भिकोबा चवले यांनी आज (ता. १७) सकाळी हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर करून मुळशीचा झेंडा फडकवला. 

चवले यांनी पाच एप्रिल रोजी हिमालयाकडे प्रस्थान ठेवले होते. लव्हार्डेचे माजी सरपंच भिकोबा चवले यांचे ते पुत्र व मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन शिवाजी चवले यांचे ते लहान बंधू आहेत. भगवान चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी सह्याद्री व हिमालयातील विविध शिखरे सर केली आहेत. सह्याद्रीतील खडापारसी, वजीर, ड्युक्‍स नोज, लिंगाणा, तैलबैल, ढाकभैरी आदी ठिकाणे पादाक्रांत केली आहेत. हिमालयातील स्टोक कांगरी, घोलप कांगरी, भागीरथी, आईसलॅंड पीक आदी शिखरे सर केलेली आहेत. चवले यांच्या यशाने मुळशीकरांच्या यशात मानाचा तुरा खोवला असून, तालुक्‍यातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Web Title: bhagwan Chavale Everest Hill Success