भाईंच्या जाण्याने लोकशाही मुल्यांचा पुरस्कार करणारे व्यक्तिमत्त्व गमावले

संदीप जगदाळे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

हडपसर - हडपसरच्या नागरिकांच्या वतीने आयोजीत भाई वैदय व मारूती काळे या दोघांच्या श्रध्दांजली सभा आओजित करण्यात आली होती. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते. ''ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि  समाजातील वंचित-उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले.

हडपसर - हडपसरच्या नागरिकांच्या वतीने आयोजीत भाई वैदय व मारूती काळे या दोघांच्या श्रध्दांजली सभा आओजित करण्यात आली होती. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर उपस्थित होते. ''ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारे आणि  समाजातील वंचित-उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात भाई वैद्य यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. त्यांच्या निधनाने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे मत शिवरकर यांनी बोलताना व्यक्त केले व्यक्त केले.

तसेच हडपसर भाजीपाला विविध सहकारी सोसायटी, साधना सहकारी बॅंक, साने गुरूजी शिक्षण संस्था, कर्मवीर भाउराव पाटील नागरी सह. पतसंस्था, महाराष्ट्र आरोग्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी साधना बॅंकेचे अध्यक्ष प्रविण तुपे, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त डॅा. अभिजीत वैदय,  महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव अनिल गुजर, कर्मवीर पतसंस्थेचे विश्वस्त प्रा. जे. पी. देसाई, माजी नगरसेवक शिवाजी पवार, दत्तात्रय तुपे, रतन काळे, विलास किरोते, रामदास गोगावले, राजेंद्र बहाळकर, जयप्रकाश जाधव, विलास कसोटे, शाम काळे, वर्षा कुलकर्णी, मनिषा गुप्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताने प्रविण तुपे म्हणाले, भाईंचे जाणे म्हणजे एका युगाच अंत झाला आहे. सभ्य, सांस्कृतिक, सहिष्णु, धर्मनिरपेक्ष, जनतेचे, कष्टकरी, कामकऱ्यांचे, विषमतेच्या सर्वांगीण निर्मूलनाने समतेचे, कायद्याचे राज्य स्थापून ते चिरस्थायी करण्यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्यरत राहिलेल्या व तसे राहण्याची प्रेरणाही देत राहिलेल्या स्वातंत्र्य संग्रामातील शांतीसैनिक, भाईंचा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर कमालीचा लोभ होता. मारूती काळे यांनी देखील संपूर्ण आयुष्य शेतीसाठी वेचले. त्यांच्या सारखे सुसंस्कृत जीवन जगणारी माणसे आज फारशी पहायला मिळत नाहीत.

प्रा. जे. पी देसाई म्हणाले, भाई वैद्य यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित संघर्ष करणारे नेतृत्व हरपले. ज्या विचारांसाठी आणि वर्गासाठी अथकपणे आयुष्यभर काम केले, त्या विचारांच्या हिताची जपणूक करण्याचा प्रयत्न करणे, हीच भाईंना खरी श्रद्धांजली होईल. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास मुल्याधिष्ठित व लोकसेवेसाठी समर्पित होता.

डॅा. वैद्य म्हणाले, भाई डॉ. लोहियांचा विचार मानणारे होते. यांच्यात असणारा प्रेमळपणा, मनमिळावू स्वभाव, समोरच्याचा मताचा आदर करणे हे सर्व त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे विचार आणि  कृतीत जराही अंतर नव्हते. जसे विचार, तशी कृती होती. सर्वांना सोबत घेऊन जाणारी वृत्ती होती. त्यांची लोकशाही आणि समाजवादी विचारांवर प्रामाणिक निष्ठा होती आणि त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवायची त्यांची तयारी होते. त्यांत जीवन आरशासारखं स्वच्छ होते.

Web Title: bhai vadya democratic values ​​are lost