दौंडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सवास रविवार पासून प्रारंभ

प्रफुल्ल भंडारी
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

दौंड (पुणे) : दौंड शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांच्या यात्रा उत्सवास रविवार (ता. ८) पासून प्रारंभ होत आहे. मध्यरात्री १ वाजून ३४ मिनिटांनी देवजन्माचा सोहळा होणार आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यांच्या यात्रा उत्सवास रविवार (ता. ८) पासून प्रारंभ होत आहे. मध्यरात्री १ वाजून ३४ मिनिटांनी देवजन्माचा सोहळा होणार आहे. 

शहरातील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात रविवारी रात्री अकरा वाजता शेखर व्यास यांचे श्री काळभैरवनाथ जन्माचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर मध्यरात्री १ वाजून ३४ मिनिटांनी देवजन्माचा सोहळा होणार आहे. गावचे पाटील तथा माजी आमदार बाळासाहेब जगदाळे - पाटील कुटुंबीयांच्या हस्ते मानाची पूजा होईल. परंपरेप्रमाणे गटणे कुटुंबीय पौराहित्य करणार असून पूजा - अर्चना अॅड. जयंत गुरव आणि कुटुंबीय करणार आहेत. सोमवारी (ता. ९) सकाळी जगदाळे - पाटील कुटुंबीयांच्या हस्ते मूर्तीस अभिषेक करण्यात येईल. रात्री ९ वाजता छबिना व पालखीच्या सवाद्य मिरवणुकीनंतर बाजारतळ येथे रात्री अकरा वाजता आतषबाजी केली जाणार आहे. त्यानंतर रात्री बारा वाजल्यानंतर पाटील चौकात संध्या माने सोलापूरकर यांचा लोकनाटय तमाशा सादर केला जाणार आहे. 

मंगळवारी (ता. १०) गाववेशीसमोरील श्री चैतन्य मारूती मंदिर प्रांगणात दुपारी साडेचार वाजता इनामी कुस्त्यांचा फड आयोजित करण्यात आला आहे. तर रात्री साडेनऊ वाजता पाटील चौकातील संगीत बारीत सुरेखा पुणेकर यांचे कला पथक ` नटरंगी नार ` सादर करणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: bhairavnath yatra celebration starts from sunday in daund