भक्ती-शक्ती पुलाचे काम वेगात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

निगडी - येथील भक्ती-शक्ती चौकात बांधण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, उड्डाण पुलाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे वेळेत मोठी बचत होणार असून, वाहतूक कोंडी फुटण्यास त्याची मदत होईल. 

भक्ती-शक्ती चौकात पुणे-मुंबई हमरस्त्यावर हा उड्डाण पूल उभारण्यात येत आहे; तर आकुर्डी व चिखली मार्गावर समतल वितलग (ग्रेड सेपरेटर) विकसित केला जात आहे. वाहतूक कोंडीवर या पुलामुळे तोडगा निघणार आहे. ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 

सध्या खांब उभारणीचे काम सुरू आहे. ग्रेड सेपरेटर सातशे मीटर लांबीचा आहे. सप्टेंबरमध्ये त्याचे काम हाती घेतले आहे. या एकूण प्रकल्पासाठी तीस महिन्यांची मुदत आहे, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक एम. एम. रेमने यांनी दिली.

Web Title: bhakti shakti chowk overbridge