कळंबच्या रोहित चव्हाणची सातासमुद्रापार भरारी ; भाला फेक स्पर्धेसाठी दक्षिण कोरियाला रवाना

राजकुमार थोरात
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

वालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित भारत चव्हाण यांची दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या 13 व्या जागतिक फायर फायटर्स स्पर्धेतील भाला फेक खेळासाठी निवड झाली आहे. देशामधून भाला फेकसाठी तो एकमेव खेळाडू असून स्पर्धेमध्ये देशाचे नेतृत्व करणार आहे. 

दक्षिण कोरिया येथे १० सप्टेंबरपासून जागतिक फायर फायटर्स स्पर्धा सुरु झाल्या आहेत. यामध्ये विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जगातील 50 देशातील खेळाडू सहभाग झाली आहे. यामध्ये  कळंब (ता.इंदापूर) येथील रोहित चव्हाणचा समावेश आहे. रोहित हा ग्रामीण भागातील खेळाडू असुन भाला फेक मध्ये तरबेज अाहे. रोहित याने राज्यस्तरीय भालफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.

तसेच पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या खुल्या गटातील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. सध्या मुंबईमध्ये अग्निशामक दलामध्ये कार्यरत असून, त्याची अग्निशामक दलाच्या वतीने भाला फेकसाठी निवड झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी भाला फेक स्पर्धा होणार असून, तो देशाचे नेतृत्व करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितचे कौतुक केले.
 
Web Title: Bhala flees to South Korea for the tournament Rohit Chavan Selected