भामा आसखेड, चासकमान पाणी फेरवाटपाची शिफारस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.

पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली. 

भामा आसखेड व चासकमान धरण प्रकल्पाच्या धरणग्रस्त आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाच्या वतीने तक्रार निवारण परिषद राजगुरुनगर (ता. खेड) येथे सोमवारी आयोजित केली होती. या वेळी महामंडळाचे संचालक राम गावडे, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, विजया शिंदे, गणेश सांडभोर उपस्थित होते.

बानुगडे पाटील म्हणाले, ‘‘चासकमान धरण प्रकल्पासाठी १६६ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दोन-तीन महिन्यांत येईल. त्यानंतर चासकमान डाव्या कालव्याचे अस्तरीकरण व इतर कामांचे प्रश्न मार्गी लागतील. गळती असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने केली जातील. चासकमान व भामा आसखेड धरणांच्या पाणलोट क्षेत्रात घ्यावयाच्या १४ बुडीत बंधाऱ्यांची तांत्रिक मान्यता जिल्हा परिषदेकडे दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhama Aaskhed Chakasman Water Distribution