भामाआसखेडचे पाणी पोहोचले खराडीत, भाजपकडून पूजन

खराडी -  पुण्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा-आसखेड प्रकल्पातील पाण्याचे पूजन करताना भाजपचे नगरसेवक आणि स्थानिक नागरिक.
खराडी -  पुण्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा-आसखेड प्रकल्पातील पाण्याचे पूजन करताना भाजपचे नगरसेवक आणि स्थानिक नागरिक.

वडगाव शेरी - पुण्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेडच्या पाण्याची चाचणी आज घेण्यात आली. या प्रकल्पाचे पाणी  विमाननगर, खराडी प्रभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाटा गार्डरूम येथील पाण्याच्या टाक्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचले. गंगा आली हो अंगणी म्हणत पाणी पूजन करीत पेढे वाटून याभागातील भाजपच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

या अनौपचारिक कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका श्वेता गलांडे - खोसे, मुक्ता जगताप, स्विकृत सदस्य विशाल साळी, आशा जगताप तसेच मनोज जगताप, विनोद बेंडभर, अब्दुल शेख, अजय वर्पे, सनी वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते. या पाण्याने पूर्व भागाची तहान नक्कीच भागेन आणि प्रभागातील पाण्याचा प्रश्नही मिटेल. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या पाठपुराव्यामुळे आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली. लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आपल्या संस्कृती प्रमाणे आज येथे आगमन झालेल्या पाण्याचे आम्ही पूजन केले, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका श्वेता खोसे गलांडे यांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील स्थानिक रहिवासी वसंतराव कामठे म्हणाले, पुण्यातील पूर्व भागाला म्हणजेच नगर रस्त्याला पहिल्यापासूनच पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत होता. पुणे महानगरपालिकेचा कर भरूनही या भागातील नागरिकाना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत होते.  भामा-आसखेडचे पाणी आमच्या भागापर्यंत पोहोचल्याने आम्हा नागरिकांना खूप आनंद झाला आहे.

विनोद बेंढभर म्हणले, बहुप्रतिक्षीत भामा आसखेड प्रकल्पातुन अंगणात आलेल्या पाण्याचे आम्ही पूजन केले आणि आज पेढे वाटून हा क्षण साजरा केला. योजना मार्गी लावणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

भामा आसखेड पाणी योजना कोणत्या राजकीय पक्षाने मंजूर केली, कोणी काम पूर्ण केले यावरून श्रेय वादाची लढाई सुरू आहे. कामाचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशावेळी संस्कृतीप्रमाणे अंगणात आलेल्या पाण्याचे भाजपच्या नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत जलपूजन करून आनंद व्यक्त केला. हा कार्यक्रम अनौपचारिकपणे पार पडला. विशेष म्हणजे या जलपूजन प्रसंगी आजी माजी आमदार दोघेही उपस्थित नव्हते.

याविषयी पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मधुकर थोरात म्हणाले, सध्या भामा आसखेडच्या जलवाहिन्यांच्या चाचण्या सुरू आहेत. तसेच जलवाहिन्या स्वच्छ करण्यात येत आहेत. जलवाहिन्यांची चाचणी यशस्वी झाली असून पाणी खराडीतील टाक्यापर्यंत पोहोचले. या चाचण्या भामा-आसखेड प्रकल्पाचे अभियंता घेत आहेत. अद्याप या जलवाहिन्या आमच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. आज लोकप्रतिनिधीनी केलेले जलपूजन हे अनौपचारिक असावे. आम्ही त्यावेळी तेथे उपस्थित नव्हतो. 

भामा आसखेड प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता विजय हवालदार म्हणाले, या प्रकल्पातील 22 किलोमीटर जलवाहिन्यांच्या चाचण्या टप्प्याटप्प्याने सध्या सुरू आहेत. त्याअंतर्गत विमान नगर वडगाव शेरी आणि खराडी येथील टक्‍क्‍यांपर्यंत चाचणी घेण्यात आली. भाजपच्या नगरसेवकांनी अनौपचारिक जलपूजन केले.  याबाबत मला माहिती नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com