का रखडले भामा आसखेड प्रकल्पाचे काम?

Bhama-Askhed-Project
Bhama-Askhed-Project

पुणे - भामा आसखेड प्रकल्पातील रखडलेली कामे पोलिस बंदोबस्तात करण्याची भूमिका महापालिकेने आता पुन्हा घेतली आहे; मात्र बंदोबस्त पुरविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याने प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार, असा प्रश्‍न आहे. दुसरीकडे मात्र जलवाहिनीचे काम होऊ देणार नाही, यावर शेतकरी ठाम आहेत. बंदोबस्त मिळण्यासाठी पोलिसांशी चर्चा करीत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक असलेल्या मुख्य जलवाहिनीचे काही काम रोखून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या आहेत.

 महापालिका आणि जिल्हा प्रशासन मागण्यांकडे काणाडोळा करीत असून, जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत काम करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे काम रखडले असून, प्रकल्प पूर्ण करण्याचा सहावा मुहूर्त हुकला आहे. त्यावर येत्या डिसेंबरअखेर बहुतांशी कामे केली जातील आणि मार्च महिन्यात प्रकल्प कार्यन्वित करू, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. तेव्हाच बंदोबस्तासाठी पोलिसांची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र पोलिसांचा फौजफाटा कधी द्यायचा? याबाबत पोलिसांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे महापालिकेला जलवाहिनीचे काम करता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. 

प्रकल्पग्रस्त शेतकरी गजानन कुडेकर म्हणाले, ‘‘पुणेकरांना पाणी देण्याला किंवा प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांचे पुनर्वसन होत नसल्याने जलवाहिनीचे काम थांबविले असून, आमच्या मागण्या मार्गी लागेपर्यंत ही कामे करू देणार नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com