Vidhan Sabha 2019 : भानुप्रताप बर्गेंचं ठरलं ! पुण्यातील 'या' मतदारसंघातून लढणार

Bhanupratap-Barge
Bhanupratap-Barge

पुणे : शिवाजीनगर मतदार संघात भाजप किंवा सेनेला जागा सुटणार यावर निर्णय अवलंबून आहे मात्र वेळ प्रसंगी सर्वांची मते विचारात घेऊन पक्ष की अपक्ष हे ठरेल, पण निवडणूक लढणार असल्याचे निवृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे.

भानुप्रताप बर्गे पुण्यात सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. यानंतर ते आता राजकारणात सक्रिय झाले असून ते शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे त्यांचा पक्ष अजून ठरलेला नाही. मात्र, अनेक पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत. भानुप्रताप बर्गे हे नाव गुन्हेगारांना चांगलंच परिचित आहे. बर्गे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

बर्गेंच्या निवृत्तीपूर्वी पुणे शहरात शुभेच्छांचे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर या चर्चांनी अधिकच वेग पकडल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा तगडा जनसंपर्क, गुन्हेगारीवर घातलेला आळा यामुळे सर्व राजकीय पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत. सर्व राजकीय गणिते पाहता बर्गे यांना कोणता पक्ष तिकीट देतो ते पाहावं लागणार आहे अन्यथा बर्गे अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील.

भानुप्रताप बर्गे यांचा परिचय
भानुप्रताप बर्गे हे नाव पोलिस दलात प्रसिद्ध आहे. 19 पेक्षा जास्त एन्काऊंटर त्यांच्या नावार आहेत. तर 400 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र एटीएसमध्ये भानुप्रताप बर्गे यांचं नाव आदराने घेतलं जातं. मूळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील असलेले बर्गे यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. 

बर्गे यांची पहिलीच पोस्टिंग मुंबईतील डोंगरीमध्ये झाली. 96 टक्के मुस्लीमबहुल भाग असलेल्या डोंगरीमध्ये गुंड दाऊद इब्राहिम, छोटा राजन, करीम लाला, युसूफ पटेल आणि हाजी मस्तान यांचा नेहमी वावर असायचे.
बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

भानुप्रताप बर्गे हे Survivals Club Membership हा दहशतवाद विरोधी कार्यामुळे मिळालेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय पोलिस अधिकारी आहेत. भानूप्रताप यांना ऑगस्ट 2009 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भानुप्रताप बर्गे यांनी धीरूभाई अंबानी आणि तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची नात यांचे अपहरण करण्याचा कट रचलेल्या चार खलिस्तानी अतिरेक्यांना अटक केली.

शूटआऊट अॅट लोखंडवाला
बर्गे हे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील एक नवा अध्याय ठरलेल्या शूटआऊट अॅट लोखंडवाला चकमकीचेही साक्षीदार आहेत. 1991 मध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या चकमकीत माया डोळस आणि दिलीप बुवा या गुंडासह सात जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता. या पथकामध्ये भानुप्रताप बर्गे यांचाही समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com