Bharat Bandh : औंध येथे बंदला चांगला प्रतिसाद

Bharat Bandh : good response bandh in Aundh
Bharat Bandh : good response bandh in Aundh

पुणे (औंध) : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात पाळण्यात आलेल्या देशव्यापी बंदला औंध येथे चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी जीवनावश्यक वस्तूंची, औषधी दुकाने, सुरळीत चालू होती. अकरा नंतर काँग्रेस पदाधीकाऱ्यांच्या वतीने बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यावसायिकांनी आपली दुकाने काही काळ बंद ठेवली. 

औंध गावठाण, परिहार चौक, डीपी रस्ता, मेडीपॉइंट दवाखाना, भाले चौक आदी ठिकाणची दुकाने कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद ठेवण्यात आली. एकंदरीत औंध व बोपोडी, शिवाजीनगर परिसरात आजचा बंद शांततेत पाळण्यात आला. यावेळी औंध व बोपोडीमधील मेडीकल दुकाने वगळता पेट्रोल पंप, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, बबन कुंभार, लता घडसिंग, रामदास विधाते, मनोज दळवी आदींनी औंध परिसरात रॅली काढून नागरीकांना बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले. यास चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने स्विकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती संमिश्र
औंध, शिवाजीगर भागातील खाजगी व पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर संमिश्र परिणाम झाल्याचे दिसून आले. गणेशखिंड येथील मॉडर्न हायस्कुल, पालिकेच्या इंदिरा गांधी शाळा औंध, राजेंद्र प्रसाद मॉडेल स्कुल बोपोडी या शाळेत परिणामकारक अनुपस्थिती नसली तरी काही प्रमाणात विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत. परंतु चिखलवाडी येथील माता रमाबाई आंबेडकर शाळेत जवळपास 80 टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती मुख्याध्यापिका स्मिता फेंगसे यांनी दिली. तर औंध येथील श्री शिवाजी विद्यामंदिर, शिरीषकुमार विद्यालय शिवाजीनगर सुरळीत सुरू होते.

इंधनाची भरमसाठ दरवाढ ही नेहमीच होत असल्याने सामान्य नागरीक त्रस्त झाला आहे.याविरोधात आजच्या देशव्यापी संपात सरकारविरोधात आक्रोश व्यक्त होत असून आम्हीही यशस्वी व शांततेत बंद पाळून सरकारचा निषेध नोंदवला.नियमीत होणा-या इंधन दरवाढीने सर्वच वस्तू,अन्नधान्य महाग होत असून यात सामान्य जनता होरपळली जात असून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने भाववाढ कमी करावी अशी आमची मागणी आहे.
- दत्तात्रेय गायकवाड,माजी महापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com