Bharat Bandh : पुण्यात हिंसक वळण, दोन बस फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत बंदमुळे पीएमपी बसची तोडफोड होत असली तरी पीएमपीएल, एसटी, रिक्षा सेवा, रेल्वेची लोकल सेवाही आज सकाळपासून सुरळीत सुरू आहे.

भारत बंदच्या दरम्यान पुण्यातील अनेक पेट्रोलपंप बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होताहेत , बंदच्या पार्शवभूमीवर अनुचित घटना घडू नये म्हणून काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप बंद ठेवला आहे. उंड्री बिशप शाळेच्या प्रशासनाने शाळा बंद ठेवली आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. जनतेने या बंदमध्ये सहभागी व्हावे असे काँग्रेस पक्षाने आवाहन केले आहे. काँग्रेसच्या आवाहनाला शिवसेना वगळता इतर बहुसंख्य राजकीय पक्ष, संघटना यांनी प्रतिसाद दिला असून, बंदमध्ये ते सामील होणार आहेत. शिवसेनेने मात्र बंदमध्ये सहभागी होण्याचे टाळले आहे. मनसेने बंदला पुर्ण पाठिंबा दर्शविला आहे. 

एसटी सेवा सुरळीत, मात्र प्रवाशांची संख्या कमी
आज भारत बंद असला तरी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन स्थानकातील सर्व बस सेवा नियोजित वेळेत सुरू आहे. कोणत्याही मार्गावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पुणे विभागाच्या व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी दिली. बंदमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचेही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh: A violent turn in Pune, attack on two buses