
Bharat Gaurav Trains : भारत गौरव रेल्वेतर्फे उत्तर भारत सहल! 'या' कालावधीत पुणे येथून प्रारंभ
कोल्हापूर : भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या उपक्रमांच्या अनुषंगाने आहे. त्याचाच भाग म्हणून ही टुरिस्ट ट्रेन येत्या २६ जून ते १ जुलै या कालावधीत पुणे ते उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी ते परत पुणे या मार्गावरील सहल घडविणार आहे. त्याचा लाभ पर्यटकांना घेता येणार आहे.
पुणे येथून २६ जूनलाही रेल्वे निघणार आहे. त्यानंतर उज्जैन- आग्रा- मथुरा- हरिद्वार- ऋषिकेश- अमृतसर- वैष्णोदेवी या चक्राकार मार्गाने प्रवास करून १ जुलैला पुण्याला परत येईल. या सहल मार्गात (बोर्डिंग/डिबोर्डिंग) साठी थांबे निश्चित आहेत. यात लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, उज्जैन, आग्रा, हरिद्वार, अमृतसर, कटरा, आणि परत वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण, कर्जत आणि लोणावळा.
आयआरसीटीसी इकॉनॉमी (शयनयान क्लास), कम्फर्ट (तृतीय वातानुकूलित) आणि डिलक्स (द्वितीय वातानुकूलित) च्या ऑफरसह ६ रात्री ९ दिवसांची ही सहल असणार आहे.
या सहल काळात पर्यटकांना ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ताजमहाल, कृष्ण जन्मभूमी, ऋषिकेश (गंगा आरतीसह), सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डर आणि माता वैष्णोदेवी मंदिर पाहता येणार आहे. अधिक माहिती संकेतस्थळ www.irctctourism.com वर उपलब्ध आहे.