#DonateOrgan अवयवदान हे पुण्यकर्म होय 

#DonateOrgan  अवयवदान हे पुण्यकर्म होय 

पुणे - ""प्राणी दुसऱ्यांसाठी जगतात. मात्र, माणूस स्वतःसाठी जगतो. मी स्वतःची किडनी (मूत्रपिंड) लष्करी जवानाला दान केली. असे करताना मला आनंद मिळाला. कारण मी एखाद्याच्या उपयोगी पडलो होतो. अवयव दान हे पुण्यकर्मच होय. म्हणून तर मी "भारत ऑर्गन यात्रे'ला निघालो आहे.'' मूळचे ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे शेतकरी प्रमोद महाजन यांनी हे मत व्यक्त केले असून, ते शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत. 

शनिवारवाडा येथून (ता.21 रविवारी ) महाजन यांनी प्रवासाला सुरवात केली. एकूण 18 राज्यांत फिरून ते अवयव दानाविषयी जनजागृती करणार आहेत. एड्‌स विषयी जनजागृती असो, की नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्यांचे वाटप असो, 67 वर्षीय महाजन नेहमी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने कार्यरत असतात. रिबर्थ फाउंडेशनने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजिली आहे. मोहन फाउंडेशन, झेडटीसीसी, बीव्हीजी, जीवनसार्थकी, रोटोसोटो, डोनेटलाईफ, मायलेज मंचर्स या स्वयंसेवी संस्थांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. महाजन यांना शुभेच्छा देण्यासाठी या संस्थांचे स्वयंसेवक तसेच त्यांच्या पत्नी सुशीला आणि मुलगी चैताली उपस्थित होत्या. नगरसेविका गायत्री खडके यांनी झेंडा फडकावून या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. 

अवयवदानातून अनेकांना जीवदान मिळू शकतो. आयुर्मान वाढू शकते. म्हणूनच अवयवदानाविषयी प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाजन भारत भ्रमंती करणार आहेत. खडके म्हणाल्या, ""अवयवदान केल्याने गरजू व्यक्तीला एकप्रकारे पुनर्जन्म मिळाल्याचे समाधान मिळेल. कदाचित कुटुंबातील व्यक्तीलाही जीवदान मिळू शकेल. म्हणून अवयवदानाबद्दल अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे आहे'' 

""मी अवयव दान केले आहे. स्वतः केल्यावर आता या विषयी जनजागृती करतोय. जनतेने सेवेची संधी द्यावी. मनोधैर्य आणि मानसिक पाठबळ असले की, कार्य घडते. याच अनुषंगाने मी जनजागृतीच्या तयारीला लागलो.'' 
- प्रमोद महाजन, अवयवदानासाठी चळवळ करणारे कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com