BharatBandh : लोणंदमध्ये सर्व स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद

lonand.
lonand.

लोणंद - देशात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती रोज मोठया प्रमाणात वाढत आसल्यामुळे महागाईने उचांक गाठला आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघली आहे. या विरोधात काँग्रेस व मित्र पक्षांच्या वतीने आज (ता. १०) रोजी पुकारलेला देशव्यापी बंदला लोणंदमध्ये सर्व स्तरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लोणंद शहर काँग्रेस समितीच्या वतीनेही लोणंद बंदचे आवाहन केले होते. 

त्यानुसार येथील ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, महिला, आदींनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के बंद पाळून बंदला उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. सकाळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या नेतृवाखाली शहरातून निषेध रॅली काढून शासणाचा निषेध करण्यात आला व नगरपंचायती समोर निषेध सभाही झाली. यावेळी नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील, काँग्रेसचे नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी 'मोदी सरकारचा धिक्कार असो' आशा घोषणाही देण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com