भारती विद्यापीठात राज्यस्तरीय निसर्गचित्रण स्पर्धेचे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ धनकवडी येथे राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 12,500 रुपयांची रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुली आहे. 

महाराष्ट्रातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ आणि भारती कला महाविद्यालय यांच्या तर्फे राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्रण स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजचे स्वतःचे ओळखपत्र तसेच रंग, ब्रश, कागद व इतर साहित्य सोबत आणावे. 

ही स्पर्धा तीन जानेवारी 2017 सकाळी 8 ते 2.30 या वेळात, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आटर्स, धनकवडी- पुणे येथे होणार आहे. या स्पर्धेचा निकाल,पारितोषिक वितरण सोहळा संध्याकाळी चार वाजता होणार असून या पारितोषिकाचे स्वरुप रोख रक्कम बारा हजार रुपये आणि प्रशस्तीपत्रक अशी आहे. 

Web Title: Bharati University organized a state-level nature of the depiction of the competition