गुरू-शिष्यांमधील अलौकिक नात्याचा उत्सव

भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) - अनुग्रह नृत्यमैफलीत सादर करण्यात आलेली भक्तिमय सामूहिक रचना.
भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) - अनुग्रह नृत्यमैफलीत सादर करण्यात आलेली भक्तिमय सामूहिक रचना.

सौंदर्यपूर्ण व नाट्यमय हालचालींनी पुरेपूर अशा तंजावुर शैलीतील भरतनाट्यम्‌ प्रकारातील नृत्यरचना नर्तिका साकार करत होत्या. काव्यालंकारयुक्त पदांवर आधारित प्रस्तुती या वेळी भावविभोर करून गेली...

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी तंजावुर येथील सरफोजी राजे भोसले यांनी नृत्यासाठी केलेल्या पदरचनांना या अनोख्या मैफलीत उजाळा मिळला. गुरू डॉ. सुचेता चापेकर यांनी याबद्दल केलेल्या संशोधनपर आस्वादक अभ्यासातून मिळवलेल्या अनमोल रचना आपल्या शिष्यांना दिल्या आहेत. शिष्यांनी एकल व सामूहिक नृत्यरचनांमधून दिलेली गुरुदक्षिणा, असे या मैफलीचे स्वरूप होते. सरफोजी राजांचे वंशज युवराज प्रतापसिंह या वेळी उपस्थित होते. 

कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित ही नृत्यमैफल सेनापती बापट रस्त्यावरील शिवाजी हाउसिंग सोसायटीजवळच्या भारतीय विद्या भवनातील सभागृहात नुकतीच पार पडली. यात लालन देसाई, सायली काणे, धनश्री आपटे, वैभवी जोगळेकर, अरुंधती पटवर्धन, अंजली बागल, तेजश्री अडिगे, केतकी शेणोलीकर, केतकी नेवपूरकर व शिल्पा देशमुख यांनी सादर केलेल्या विविध नृत्यरचना आनंदित करणाऱ्या ठरल्या. श्रीराम (मृदंगम्‌), श्रीबालसुब्रमण्यम्‌ (व्हायोलिन), शिवप्रसाद (गायन) व सुचेताताई (नट्टुवंगम्‌) साथ केली.

भक्ती तसेच शृंगार रसप्रधान रचनांची प्रस्तुती करणारा हा गुरू-शिष्यांमधील अलौकिक नात्याचा उत्सव प्रसन्न करून गेला. खंडिता नायिका, कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेली, सखीशी हितगूज करणारी आणि पतीला प्रसंगी योग्य ते सांगणारी नायिका या वेळी साकारली गेली. नंदीने शिवशंकराच्या कृपादृष्टीसाठी केलेला युक्तिवाद लोभस रचनांमधून आनंदित करून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com