भरणेवाडीत वनहद्दीतील अतिक्रमणे हटविली (व्हिडिओ)

राजकुमार थोरात
सोमवार, 17 डिसेंबर 2018

वालचंदनगर (पुणे) भरणेवाडी (ता. इंदापूर) हद्दीतील वनजमिनीवर शेतकऱ्यांनी केलेले 43 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण वन विभागाने जेसीबी मशिनच्या साहाय्याने हटविले.

वालचंदनगर (पुणे) भरणेवाडी (ता. इंदापूर) हद्दीतील वनजमिनीवर शेतकऱ्यांनी केलेले 43 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण वन विभागाने जेसीबी मशिनच्या साहाय्याने हटविले.

इंदापूर तालुक्‍यात वनजमिनीवरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम वनविभागाच्या माध्यमातून सुरू आहे. हिंगणगाव, पळसदेवनंतर आज भरणेवाडीत अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेचा तिसरा दिवस होता. भरणेवाडी परिसरातील वनक्षेत्रालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले असून, यात अनेकांनी फळबागांची लागवड केली होती. पुणे विभागाच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी ए., सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, इंदापूर तालुक्‍याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती. भरणेवाडी परिसरातील सुमारे 43 एकरांवरील अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण काढण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या असून, नकाशाची माहिती देऊन व मोजणी करून अतिक्रमण हटविण्यात येत होते.

"वनक्षेत्रातील सर्व अतिक्रमण हटविणार'
पुणे विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मी ए. यांनी सांगितले, की पुणे जिल्ह्यात वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे. इंदापूर तालुक्‍यात आजपर्यंत 169 एकर क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली असून, उर्वरित अतिक्रमणेही तातडीने हटविण्यात येणार आहेत.

Web Title: bharnewadi forest departmetn Declined encroachment