भाटघर धरणाला धोका नाही 

ज्ञानेश्वर बिजले
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

भाटघर धरणाच्या भिंतीतून कोणत्याही स्वरुपाची पाणीगळती होत नसून, हे धरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याला कोणताही धोका नाही, असे जलसंपदा विभागाचे पुण्याचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

पुणे : भाटघर धरणाच्या भिंतीतून कोणत्याही स्वरुपाची पाणीगळती होत नसून, हे धरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याला कोणताही धोका नाही, असे जलसंपदा विभागाचे पुण्याचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

या धरणाच्या येथील जलविद्युत प्रकल्पातील हवा जाण्यासाठी उभारलेल्या व्हेंटीपाईपमधून ते पाणी बाहेर पडत आहे. तो पाईप गंजल्यामुळे, त्यातून पाणी गळती होत आहे. धरणाच्या भिंतीशी त्याचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की विनाकारण चुकीच्या माहितीमुळे धरण परिसरातील नागरीकांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. 

भाटघर धरणाची पाणीसाठा क्षमता 23.5 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. ते 99 टक्के भरले आहे. हे धरण ब्रिटीश काळात नीरा नदीवर बांधण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhatghar dam is not in danger