भाटघर शंभर टक्के भरले

विजय जाधव
रविवार, 4 ऑगस्ट 2019

दुपारी सव्वाचारच्या सुमारास धरणात 23.74 (शंभर टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आणि स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. तासाभरात एकामागून एक असे 18 स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. स्वयंचलित दरवाजांमधून 8 हजार 10 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला.

धरणाच्या स्वयंचलित 18 दरवाजांतून विसर्ग सुरू

भोर ः तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण रविवारी (ता.4) दुपारी सव्वाचारच्या सुमारास शंभर टक्के भरले. धरणाच्या स्वयंचलित 45 दरवाजांपैकी 18 दरवाजांमधून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
रविवारी सकाळी धरणातील पाणीसाठा 98 टक्के झाल्याने दुपारी एक वाजता वीजनिर्मिती केंद्रातून 1 हजार 684 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर दुपारी सव्वाचारच्या सुमारास धरणात 23.74 (शंभर टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आणि स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. तासाभरात एकामागून एक असे 18 स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. स्वयंचलित दरवाजांमधून 8 हजार 10 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
या वेळी शाखा अभियंता ए. एच. नलवडे, नाना कांबळे उपस्थित होते. या वर्षी पाऊस उशिरा सुरू होऊनही गतवर्षीपेक्षा धरण 9 दिवस अगोदर भरले. गतवर्षी धरण 13 ऑगस्टला; तर 2017 मध्ये 28 ऑगस्टला भरले होते. दरम्यान, या मोसमात भाटघर धरण खोऱ्यात आजपर्यंत 2 हजार 112 मिलिमीटर; तर नीरा-देवघर धरण खोऱ्यात 2 हजार 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhatghar dam overflow