भाटनगर चौकात बेशिस्तीमुळे रोजच कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पिंपरी : "येऽ चल, मागे घे गाडी, दिसत नाही का?', "अरे, तूच मध्ये घुसलाय, ते बघ आधी,' हा संवाद रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारामध्ये सुरू असतानाच, हॉर्न वाजवून "ओ काका, थोडी पुढे घ्या,' असे म्हणत एका तरुणाने पदपथावर दुचाकी चढवली आणि निघून गेला. अन्य वाहनचालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. अखेरीस दोन तरुणांनीवाहतूक नियंत्रकाचे काम बजावून चौक मोकळा केला.

पिंपरी- चिंचवड लिंक रस्त्यावर भाटनगर येथील चौकात बुधवारी (ता. 6) दुपारी दोनच्या सुमारास घडलेला हा प्रसंग, वाहतूक कोंडीचे गांभीर्य सांगून गेला. पिंपरी- चिंचवड लिंक रस्ता नेहमी वर्दळीचा. विशेषतः पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पुलावरून चिंचवडकडे जाण्यासाठी दुहेरी मार्ग. मात्र, दुभाजक नसल्याने कुणी, कसेही वाहने चालवतात. पूल संपतो त्या ठिकाणीच चौक असल्याने पिंपरी कॅम्पातील मुख्य बाजारपेठेचा रस्ता, रिव्हर रोड व लिंक रस्ता तीनही बाजूने वाहने येथे एकवटतात. लोहमार्गालगत असलेल्या वस्तीतून येणारी वाहने वेगळीच. या परिसरात किराणा व भुसार मालासह अन्य वस्तूंच्या घाऊक व्यापाऱ्यांची दुकाने व गोदामे आहेत. त्यामुळे वाहनांची नेहमीच गर्दी असते. प्रत्येक वाहनचालक आपले वाहन दामटण्याचा प्रयत्न करतो. परिणामी, वादाला तोंड फुटते. त्यातून कोंडी वाढत जाते. असाच प्रसंग बुधवारी दुपारीही बघायला मिळाला. 

वाहतूक पोलिस, वॉर्डन नियुक्त 
भाटनगर येथील चौकात सकाळी व सायंकाळी वाहनांची अधिक वर्दळ असते, त्या वेळी मात्र येथे वाहतूक नियंत्रक पोलिस व वॉर्डन आवर्जून नियुक्त केले जातात, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: bhatnagar chowk intimidated on the ground every day