गांधींच्या ‘बायोपिक’वरून भावे यांनी बदलली भूमिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

‘‘मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते, सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्‍य समजत नाही आणि मी ही समजत नाही. संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत...’’, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावे यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील ‘बायोपिक’ करण्याची आपली भूमिका बदलत असल्याचे संकेत ‘फेसबुक’वर केलेल्या पोस्टमधून दिले. 

पुणे - ‘‘मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते, सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्‍य समजत नाही आणि मी ही समजत नाही. संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत...’’, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावे यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील ‘बायोपिक’ करण्याची आपली भूमिका बदलत असल्याचे संकेत ‘फेसबुक’वर केलेल्या पोस्टमधून दिले. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गांधी नुकतेच पुण्यात आले होते. त्या वेळी भावे यांनीही व्यासपीठावर गांधी यांच्याशी संवाद साधला. ‘‘मी तुमच्या सारखा दिसतो,’’ अशी सुरवात करून मी लोकमान्य टिळकांसह इतर दिग्गज व्यक्तींचे ‘बायोपिक’ केले आहे. त्यासाठी मी त्या व्यक्ती समजून घेतो. तुमच्यावरही बायोपिक करायला आवडेल, अशी भूमिका घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर भावे यांनी रविवारी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘‘मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर ही जबाबदारी देणाऱ्या उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे. आजपर्यंत मी अनेक राजकीय नेत्यांना प्रेमाने भेटलो. गांधी यांनाही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने भेटलो.’’
या पोस्टशेवटी ‘‘आता मुद्दा त्यांच्यावर चरित्रपट करायचा !’’ असे म्हणत भावे यांनी ‘‘कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला,’’ असे म्हटले आहे. 

Web Title: Bhave role changed from Gandhi biopic