केरळ पूरग्रस्तांसाठी भीमाशंकर साखर कारखान्याकडून मदत

सुदाम बिडकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी एकुण सात लाख रुपयांची मदत केरळ राज्याचे चीफ मिनिस्टर डीस्ट्रीज रिलीफ फंड यांच्या तिरुअनंतपुरम येथील कार्पोरेट शाखेकडे आरटीजीएस च्यामाध्यामातुन दिली असल्याची माहीती भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

केरळमध्ये झालेल्या अतीवृष्टीने शेकडो नागरिकांचा मृत्यु झाला तर लाखो नागरिक बेघर झाले आहेत. गावच्या गावे घरासह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कोट्यावधी रुपयांची वित्तहानी झाली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तेथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांपासुन वंचीत असुन त्यांचे जीवन पुर्वपदावर येण्यासाठी त्यांना सर्वोतपरी मदत करण्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष व भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक/अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार भीमाशंकर साखर कारखाण्याने पाच लाख रुपये, कारखाना कर्मचाऱ्यांचे अर्धा दिवसाचे वेतन एक लाख 75 हजार रुपये व भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन 25 हजार रुपये असे एकूण सात लाख रुपयांची मदत केरळ पूरग्रस्तांसाठी दिली.

Web Title: bheema shankar sugar factory helps kerala flood victim