महामानवाला पुष्पहार घालून आदरांजली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्याला आज हजारो नागरिकांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.  

पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्याला आज हजारो नागरिकांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.  

पुणे शहरासह राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी भावूक होत, त्यांना वंदन केले. यात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. नागरिकांसोबतच पुण्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी पुणे स्टेशन येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन केले. दिवसभर येथे लोकांची रीघ लागली होती. या ठिकाणी रक्तदान शिबिर, विचारांचा जागर करण्यासाठी आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर आधारित पुस्तकांचे वाचनही करण्यात आले. काहींनी एकमेकांना बाबासाहेबांच्या ग्रंथांचे वाटप करत वेगळ्या पद्धतीने वंदन केले. शहरभरात अनेक ठिकाणी बुद्ध विहारांमध्ये, बुद्ध वंदना तसेच मेणबत्ती पेटवून महामानवाला वंदन करण्यात आले. 

Web Title: Bhim devotees gather B R ambedkar statue near pune station