बँकेने जप्त असलेली साखर विक्री करून कर्ज वसुल करावे

दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार राज्य सहकारी बँकेचे 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज असल्याचे दिसून येत आहे.
Bhima Sahkari Sugar Factory
Bhima Sahkari Sugar FactorySakal
Summary

दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार राज्य सहकारी बँकेचे 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज असल्याचे दिसून येत आहे.

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sahkari Sugar Facotry) 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार (Balance Sheet) राज्य सहकारी बँकेचे (State Bank) 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज (Loan) असल्याचे दिसून येत आहे. तर कारखान्याकडे 32 कोटी 11 लाख 2 हजार 416 रूपयांची साखर शिल्लक आहे. त्यामुळे बँकेने जप्त असलेली साखर विक्री करून कर्ज वसुल (Recovery) करावे. तसेच कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी. अशी मागणी भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे नामदेव ताकवणे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे लेखी निनेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांना आज (ता. 6) भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्यावतीने नामदेव ताकवणे यांनी लेखी निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. हे कर्ज वसुल करण्यासाठी राज्य बँकेने भीमा सहकारी साखर कारखाना 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्याची जाहिरात वर्तमानपत्रातून दिली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या ताळेबंदनुसार राज्य सहकारी बँकेचे 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे येवढी थकीत कर्ज रक्कम दिसते. याच ताळेबंदनुसार कारखान्याकडे 32 कोटी 11 लाख 2 हजार 416 रूपये किंमतीची साखर शिल्लक आहे. त्यामुळे या शिल्लक साखरेच्या विक्रीतून बॅकेचे कर्ज वसुल करून घेणे शक्य होते. तरीही बँकेने कारखान्याची 500 कोटीची मालमत्ता जप्त करून 49 हजार 350 सभासदांवर अन्याय केला आहे.

साखर विक्रीतून कर्ज वसुल होत असतानाही बँकेने कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने संगनमताने कारखान्याची मालमत्ता हेतुपुरस्सर जप्त करून हडपण्याचा डाव आहे. कारखान्याच्या शिल्लक साखर विक्रीतून कर्ज वसुली होत असताना कारखाना भाडेतत्त्वावर देऊन कर्जवसुली करण्याचा निर्णय सभासदांवर अन्याय करणारा आहे. तरी बँकेने त्वरित भीमा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया थांबून साखर विक्रीतून कर्ज वसुली करावी. यासंदर्भात बँकेने आठ दिवसात खुलासा करावा. अन्यथा बॅक जाणिवपूर्वक कारखान्याच्या सभासदांची फसवणूक करीत असल्याचे समजून कायदेशीर न्यायालयीन कारवाई केली जाईल असा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना बचाव समितीने लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com