सावधान! भीमाशंकर रस्त्यावर वाहने सावकाश चालवा कारण...

डी के वळसे पाटील
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

- भीमाशंकर ते म्हतारबाचीवाडी हा रस्ता अरुंद आहे. दिवसा आणि रात्री दाट धुके असते. धोकादायक वळणांची संख्या २५ आहे.

- रस्त्याच्या कडेला रिफलेक्टिर आणि दिशा दर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

मंचर : भीमाशंकर ते म्हतारबाचीवाडी हा रस्ता अरुंद आहे. दिवसा आणि रात्री दाट धुके असते. धोकादायक वळणांची संख्या २५ आहे. रस्त्याच्या कडेला रिफलेक्टिर आणि दिशा दर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

श्रावण महिना सुरु झाल्याने बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी दररोज राज्यातील व परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने बसेस, चार चाकी गाडीतून या रस्त्याने ये-जा करतात. सोमवारी आणि शनिवारी तर वाहनांची संख्या तीस हजाराच्या पुढे जाते.

दाट धुके व धोकादायक वळणामुळे रस्त्याचा भाग व्यवस्थित दिसत नाही. या पावसळ्यात परिसरात सतत धुके असते. त्यामुळे गेल्या आठवड्यात पाच ते सहा वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जावून अपघात झाले आहेत. या रस्त्याचा संपूर्ण भाग भीमाशंकर अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. दाट झाडीतून या रस्त्याचा मार्ग आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला पांढरे पट्टे, ठिकठिकाणी भाविकांसाठी सूचना फ़लक, रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावेत. अशी मागणी वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhimashankar road has heavy fog which is dangerous for travellers