भीमाशंकर साखर कारखाना देशात चौथ्यांदा सर्वोत्कृष्ठ 

सुदाम बिडकर 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पारगाव (पुणे) : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) यांचा सन 2017-18 या करिता 'देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना' पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 10 सप्टेंबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व इतर विद्यमान केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दीली.

पुरस्काराबद्दल आधिक माहीती देताना बेंडे म्हणाले आर्थिक वर्षात केलेले ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजणा, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणुक, वेळेत अदा केलेले ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्तमुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध नीधी, विनीयोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करुन कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे सांगीतले.

कारखान्याचे संस्थापक/अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडाळाचे धोरण, आधिकारी व कर्मचार्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापुर्वी कारखान्यास देशपातळीवरील 9 व राज्य पातळीवरील 9 असे एकुण 18 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ठ सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळविणारा देशातील भीमाशंकर हा एकमेव कारखाना असल्याचे उपाध्यक्ष बेंडे यांनी सांगीतले.

Web Title: Bhimashankar sugar factory is the best in the country