भीमाशंकर साखर कारखाना निवडणूक राष्ट्रवादीच्या १८ जागा बिनविरोध तीन जागांसाठी निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

भीमाशंकर साखर कारखाना निवडणूक राष्ट्रवादीच्या १८ जागा बिनविरोध तीन जागांसाठी निवडणूक

पारगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण २१ जागांसाठी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते काल मंगळवार अर्ज माघारी घेण्याच्या मुदती अखेर एकूण ८० उमेदवारांनी माघार घेतल्याने भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले तर शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने तीन जागांसाठी निवडणूक होणार हे निच्छित झाले आहे. मतदान रविवार (दि १७) रोजी होणार आहे.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक असलेल्या भीमाशंकर कारखाना प्रत्येक गाळप हंगामात परिसरातील इतर कारखान्याच्या तुलनेने ऊसाला उच्चांकी बाजारभाव देत आला आहे. त्यामुळे भीमाशंकर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व संचालक मंडळ, कर्मचारी व अधिकारी यांच्या योग्य नियोजनामुळे कारखान्यास आत्तापर्यंत देशपातळीवरील ११ व राज्यपातळीवरील ११ असे एकूण २२ पुरस्कार प्राप्त झाले आहे. कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळास सुमारे दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली होती.

एकूण २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विद्यमान संचालकांपैकी १९ संचालकांनी पुन्हा अर्ज दाखल केले होते. शिवसेनेने काही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज माघारीच्या दिवशी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली. परंतु शिंगवे – रांजणी गटात तुकाराम बाबुराव गावडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर हे तिन्ही विद्यमान संचालक रिंगणात असल्याने तीन जागांसाठी निवडणूक होत आहे.

श्री. गावडे यांच्या माघारीच्या मनधरणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही अपयश आले. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था – दिलीप वळसे पाटील, मंचर / महाळुंगे गट- बाळासाहेब बेंडे, अंकित जाधव, अरुण चासकर, घोडेगाव / शिनोली गट- अक्षय काळे, सीताराम लोहोट, बाजीराव बारवे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक / निरगुडसर गट- प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, अशोक घुले, अवसरी बुद्रुक/ पेठ गट- आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, शांताराम हिंगे, अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी – ज्ञानेश्वर आस्वारे, महिला राखीव प्रतिनिधी – पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – नितीन वाव्हळ, भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागासप्रवर्ग – रामहरी पोंदे.

अरुण गिरे (शिवसेना तालुका प्रमुख)

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शेतकरी हिताच्या चांगल्या चाललेल्या साखर कारखान्याला सहकार्य करण्याच्या दृष्टीने श्री. आढळराव पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली अपक्ष उमेदवार तुकाराम गावडे यांनी फक्त सुरवातीला तुमच्या पॅनेल मध्ये घेता का अशी विचारणा केली होती त्यांचा व शिवसेनेचा कसलाही दुरापास्त सबंध नसल्याचे जाहीर केले.

महत्वाचे मुद्दे-

बिनविरोध निवडून आलेले आठ व निवडणूक लढवीत असलेले तीन अशा प्रकारे ११ विद्यमान संचालकांना पुन्हा संधी,१० नवीन चेहऱ्यांना संधी, तरुण व जेष्ठांचा मेळ घालत तालुक्याच्या सर्व भागांना प्रतिनिधित्व.

Web Title: Bhimashankar Sugar Factory Election Ncp 18 Seats Unopposed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..