Pune News : भीमाशंकर कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास प्रथम क्रमांक' पुरस्कार

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास प्रथम क्रमांक पुरस्कार' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पद्मभूषण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
pune
punesakal

पारगाव : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास सन २०२१-२२ हंगामासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. (नवी दिल्ली) यांचा उच्च साखर उतारा विभागातील 'सर्वोत्कृष्ट ऊस विकास प्रथम क्रमांक पुरस्कार' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पद्मभूषण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बुद्रुक ) येथे आज शनिवारी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करणेत आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे,

हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक संभाजी कडू पाटील तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

भीमाशंकर कारखान्याच्या वतीने पुरस्काराचा स्वीकार अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी अध्यक्ष विद्यमान संचालक देवदत्त निकम, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे व मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी केला.

सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत माहिती देताना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या ऊस विकास योजनेची मागील सहा वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी करीत असल्यामुळे सरासरी एकरी उत्पादनामध्ये वाढ झाल्याने ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचे उत्पन्न मिळू लागले आहे.

योजनेत ऊस बेणे बदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागणीवर भर, कार्यक्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाची अंमलबजावणी, माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांच्या वापरावर भर, ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करुन नियंत्रणावर विशेष भर, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठ्यावर भर,

खोडवा पीक व्यवस्थापनावर जास्तीत जास्त भर, कृषी कर्मचारी व शेतकरी प्रशिक्षणावर विशेष भर, कृषी निविष्ठांचा मोठया प्रमाणावर पुरवठा, उत्कृष्ठ बायोकंपोष्ट खताची निर्मिती व पुरवठा, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १२ व राज्य पातळीवरील १२ असे एकूण २४ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. अशी माहिती उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com