भिमराव आंबेडकर यांचे लोणंद मध्ये स्वागत

रमेश धायगुडे
शनिवार, 19 मे 2018

लोणंद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांनी आज (ता. १९) रोजी लोणंद येथील बुद्ध विहारला भेट दिली. त्यावेळी बुध्द विहारात धार्मिक प्रार्थनाही म्हटली. त्यानंतर त्यांनी उपस्थीत नागरीकांशी संवाद साधला.

लोणंदचे बुद्ध विहार सुंदर आहे, मनापासून भावले, येथे राबवण्यात येत असलेल्या धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. येथील बुध्द विहार कायम स्वच्छ व टापटीपत ठेवावे. आणि धम्माच्या ज्ञानाचे केंद्र व्हावे, आशी अपेक्षा व्यक्त करुन लोणंदला पुन्हा येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. धम्म परिषदेसाठी लोणंदहून ते फलटणला निघाले होते. त्यावेळी त्यांनी ही भेट दिली. यावेळी अनेकांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. लोणंद- सातारा रस्त्यापासून ते बुद्ध विहारांपर्यंत ते पायी चालत गेले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

Web Title: Bhimrao Ambedkar visits Lonand