भीमथडी जत्रा येत्या २२ डिसेंबरपासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

बारामती - ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या वतीने आयोजित भीमथडी जत्रा येत्या २२ ते २६ डिसेंबर या दरम्यान पुण्यातील सिंचननगर येथे भरणार आहे. जत्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. मागील वर्षीच्या बळीराजा संकल्पनेनंतर आधारित असलेली यात्रा यंदा कोल्हापुरी आकर्षण असलेली असेल. 

जत्रेबाबत संस्थेच्या विश्‍वस्त व जत्रेच्या आयोजक सुनंदा पवार यांनी माहिती दिली, की भीमथडी जत्रेत शेतकरी बाजार, विषमुक्त अन्न ही संकल्पना याही वर्षी आहे. त्याचबरोबर विविध भागांतील खाद्यसंस्कृती जोपासणारे महिला बचत गटांचे तीनशेहून अधिक स्टॉल या जत्रेत असणार आहेत.

महाराष्ट्रातील पारंपरिक कलाकार, कारागिरांनी केलेल्या ग्रामीण हस्तकलेच्या वस्तू, पारंपरिक दागिने, मातीच्या वस्तू, विणकाम, कपड्यांचा या जत्रेत समावेश आहे. या वर्षीच्या जत्रेत शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतीमाल, कोल्हापुरी पानापासून ते पारंपरिक दागिन्यांपर्यंत, आदिवासी भागातील तांदूळ, मधापासून आयुर्वेदिक उत्पादनांचाही समावेश राहणार आहे. 

तेरावे वर्ष ऑनलाइन 
भीमथडी जत्रेने गेल्या एक तपापासून हजारो महिलांना बाजारपेठ मिळवून देत महिलांना उद्योजक बनवले. ही जत्रा ग्रामीण संस्कृतीचा शहरी भागाशी एक संवाद बनली. आता ही जत्रा ऑनलाइन झाली आहे. ट्रस्टने ‘भीमथडी बाजार वेब’ ही संकल्पना सुरू केली आहे. त्या माध्यमातून भीमथडी जत्रेतील उत्पादने ऑनलाइन मिळणार आहेत. त्यातच या वर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात २२, २३, २५ डिसेंबर या तीन दिवशी बॅंका बंद आहेत. त्यामुळे जत्रेत एटीएम व पेटीएम सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

देशभरातील सांस्कृतिक कार्यक्रम 
भीमथडी जत्रेत २२ डिसेंबर रोजी काश्‍मिरी संगीतकार सुफियान मलिक यांची राबाब मैफल होणार असून, २३ डिसेंबर रोजी त्रिधरा आभाऊती व ऋषिकेश पवार हे कथा, शास्त्रीय कथक सादरीकरण करतील. २४ डिसेंबर रोजी कविता सेठ यांचा गीतांचा कार्यक्रम होणार असून, २५ डिसेंबर रोजी मराठी अभंगांचा अभंग रिपोस्ट हा जाझ स्वरूपात कार्यक्रम सादर होणार आहे. २६ डिसेंबर रोजी स्पंदन हा कथक व बॉलिवूड फ्युजन कार्यक्रम होणार आहे. तसेच आदिवासी तारफा, घुंगरू लोकनृत्याची मेजवानीही अनुभवायला मिळणार आहे.

Web Title: Bhimthadi jatra