पुणे : भीमथडी जत्रेत तब्बल एवढ्या पैशांची झाली उलाढाल

Bhimthadi Jatras turn over is Near by 2 cr
Bhimthadi Jatras turn over is Near by 2 cr

पुणे : भीमथडी जत्रेला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला असून, यावर्षी सहभागी महिला बचत गट उत्पादनांची दोन कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. अफगाणिस्तानातील महिला उद्योजकांचा प्रातिनिधिक सहभाग तसेच देशातील 14 राज्ये आणि महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांतील महिला बचत गटांचा सहभाग यंदाच्या भीमथडी जत्रेचे वैशिष्ट्य ठरले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सामाजिक संस्था मदतीतून आयोजित 14 व्या भीमथडी जत्रेस पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयोजक सुनंदा पवार यांनी दिली. वेगवेगळ्या भागात सामाजिक हेतूने महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था, ग्रामीण भागातील बचत गटांना संधी देत दिव्यांग आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या कलाकारांना घेऊन ही भीमथडी जत्रा पार पडली.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी 'या' आहेत महत्वाच्या दहा टिप्स

पारंपारिक कला आणि कलाकार यांचा सहभाग, हस्तकला वस्तू, कपडे, ग्रामीण शाकाहारी, मांसाहारी खाद्य महोत्सव, ग्रामीण महिलांनी बनविलेले उत्तम प्रतीचे पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची अशा अनेक वस्तूंचे बचत गट या वेळी सहभागी झाले होते. या प्रदर्शनास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, चेअरमन राजेंद्र पवार, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी.विश्वनाथा, सहयोगी अधिष्ठाता प्रमोद रसाळ यांच्यासह सामाजिक संस्थांसह नागरिकांनी भेट दिली. यावर्षी भीमथडी जत्रेत एकूण 331 स्टॉल लावण्यात आले होते. तर, एकूण 348 महिला बचत गट सहभागी झाले होते. सुमारे 85 हजार नागरिकांनी जत्रेला भेट दिली. या जत्रेत लोककलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com