पुणे : लॉकडाऊनमुळे भिशीचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

Money
Money

पुणे : पैशाची बचत आणि एकगठ्ठा मिळणारी मोठी रक्कम यामुळे 'भिशी' हा प्रकार व्यापारी तसेच सामान्य लोकांमध्येही आवडीचा आहे. मात्र, लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वच 'भिशी'चे व्यवहार थंडावले आहेत. ज्यांनी यापूर्वीच पैसे उचलेले आहेत ते बिनधास्त असले तरी त्यांनी शेवटच्या टप्प्यात पैसे उचलण्याचा विचार केला होता, अशा सदस्यांचे लाखो रुपये अडकून पडल्याने ते हवालदिल झाले आहेत. 

मोठे व्यापारी, दुकानदार, भाजीवाले यासह नोकरदार, महिला यांच्यामध्ये 'भिशी' हा प्रकार लोकप्रिय आहे. यामध्ये दर महिन्याला अवघ्या पाच हजारा पासून ते १० लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार होतो. काही जण दर महिन्याला चिठ्ठी टाकून 'भिशी'साठी सदस्य निवडतात. मोठ्या 'भिशी'मध्ये बोली लावून पैसे घेण्याचा प्रघात आहे.  'भिशी'ला कोणताही कायदेशीर अाधार नसला तरी ती केवळ एकमेकांच्या विश्वासावरच चालवली जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्याच्या अखेरीस 'लाॅकडाऊन' सुरू झाला, तेव्हापासून ते जून महिन्यापर्यंत दुकाने, शोरूम यासह सर्व अस्थापना बंद होत्या. त्याचा परिणाम 'भिशी'वर झाला आहे. दर महिन्याला ठरेलेली रक्कम गेले तीन महिने जमा झालेली नाही. दुकानच बंद असल्याने सदस्यांनी हात वर केले आहेत. ज्या सदस्यांनी लाॅकडाऊन पूर्वी 'भिशी'वर उचलली त्यांना पूर्ण पैसे मिळाले असल्याने ते खुशीत आहेत. पण ज्यांनी वर्षभर ठरलेला हिस्सा भरून पुढील दोन तीन महिन्यात पैसे उचलण्याचे नियोजन केले होते असे सदस्य टेंशनमध्ये आहेत. त्यांचे हजारो लाखो रुपये 'भिशी'त अडकले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी लावली जाते बोली...

'भिशी'मध्ये दर महिन्याची जमा करण्याची रक्कम ठरलेली असते. 'भिशी' काढताना त्या महिन्यात जास्त जणांना पैसे हवे असल्यास बोली लावली जाते. जो सर्वात कमी रक्कम सांगतो त्यास त्या महिन्याचे पैसे मिळतात. त्यामुळे महिन्याच्या ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम सदस्यांना जमा करावी लागते. मात्र जो सदस्य वर्षभर थांबून 'भिशी'च्या शेवटच्या टप्प्यात पैसे उचलतो. त्यास त्याने वर्षभर भरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळते. एकगठ्ठा बिनव्याजी रक्कम मिळत असल्याने अशा प्रकारच्या'भिशी' व्यापारी वर्गात चालवल्या जातात.

सर्व जबाबदारी 'बाॅस'ची

जो 'भिशी'चे सदस्य एकत्र करणे, प्रत्येक महिन्याला पैसे जमवून बोली लावून पैसे वाटप करतो अशा भिशीचालकासाठी 'बाॅस' हा शब्द प्रचलित आहे. त्याच्या शब्दावर सर्व व्यवहार चालतात. लाॅकडाऊन मुळे 'भिशी'साठी पैसेच जमा होत नसल्याने वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे समजूतीने घेऊनच 'भिशी' पुढे न्यावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. एक जण चार पाच पेक्षा जास्त भिशींचा 'बाॅस' असतो. विशेष म्हणजे बाॅसला  भिशी लावताना त्यात बोली होत नाही, सदस्यांना त्याच्यासाठी पूर्ण रक्कम द्यावी लागते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'मुळे भिशीचे गणित बिघडले आहे. अनेकजण आमच्या भिशीचे काय असे चौकशी करतात, काही जण माझे पैसे देऊन म्हणून दादागिरी करतात. अशा सदस्यांची समजूत घालून 'भिशी सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुणे शहरातील सर्वच 'भिशी'मध्ये कमी जास्त हिच अवस्था आहे.''

- एक भिशी चालक 

"माझी दर महिन्याला पाच हजाराची भिशी आहे, पुढच्या दोन चार महिन्याला पैसे उचलणार होतो, पण लाॅकडाऊन मुळे काहीच करता आले नाही. आतापर्यंत भरलेले पैसे बुडतील का याचीच भिती वाटत आहे."

- एक भिशी सदस्य

- शहरात ५०० रुपये  ते  ५० हजार प्रती महिनाच्या भिशी
- हजारो भिशी शहरात चालतात. 

- कोट्यावधी रुपयांची दर महिन्याची उलाढाल
- कोरोना मुळे तीन चार महिने झाले भिशी न निघाल्याने वादाचे प्रसंग

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com