समस्यांवर कर्तृत्वाने समाधानाचे साधन व्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - ‘जगासमोर उभ्या असलेल्या अनंत समस्यांचा केवळ आक्रोश करून स्वतःच एक समस्या होण्यापेक्षा आपल्या कर्तृत्वाने त्यावरील समाधानाचे साधन व्हा,’’ असा संदेश पतंजली योगपीठाचे आयुर्वेदतज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण यांनी दिला. डॉ. श्रीपाद कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल’च्या वतीने आचार्य बाळकृष्ण यांना डॉ. कांतिलाल संचेती यांच्या हस्ते ‘भीष्म पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी आचार्य बाळकृष्ण यांनी ‘‘संकल्पाचे बाळ हे कोणत्याही साधनसामग्रीपेक्षा अधिक असते, कितीही प्रतिकूलता आणि अभाव असला तरीही कार्याचा उद्देश व प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश निश्‍चितच मिळते,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली. 

पाच लाख रुपये रोख, ताम्रपत्र, महावस्त्र, पुणेरी पगडी आणि पुष्पमाला असे पुरस्काराचे स्वरूप होते. आचार्य बाळकृष्ण यांनी पुरस्काराच्या रकमेत स्वतःची भर घालून ११ लाखांची देणगी संस्कृती संवर्धनासाठी गुरुकुलला दिली.  
या कार्यक्रमाला गुरुकुलचे संस्थापक आचार्य किशोरजी व्यास, डॉ. रवींद्र कुलकर्णी, उद्योगपती रामकुमार राठी, पतंजली पिठाचे संचालक हरिभाई शहा, गुरुकुलचे विश्‍वस्त सचिव डॉ. प्रकाश सोमण, खजिनदार रत्ना दाढे, गीता परिवार पुणे शाखा प्रमुख सत्यनारायण मुंदडा, डॉ. अशोक कामत, श्रीपाद देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Bhishma Award Balkrishna