Bhoi Pratishthan Holi 2023: आनंदाचे रंग, आनंद तरंग! वंचित चिमुकल्यांची रंगली धुळवड

भोई प्रतिष्ठानच्या रंग महोत्सवात 1700 विशेष मुलांनी लुटला आनंद
Bhoi Pratishthan
Bhoi Pratishthan

पुणे : होळी त्याबरोबर येणारी धुळवड अन् रंगपंचमी म्हणजे जीवनातील आनंदाचा काळ. कुठल्याही वयातल्या, कुठल्याही वर्गातल्या बच्चे कंपनीसाठी हा उत्सव आनंदाचा ठेवाच जणू! पण बालपणातला हा काळ प्रत्येकाला अनुभवायला मिळतोच असं नाही. अनाथ, अपंग, गंभीर आराजानं ग्रस्त, रस्त्यावर भटकणारी अशी असंख्य वंचित मुलं याबाबत कमनशिबीच! पण या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलण्याचं काम अनेक वर्षांपासून भोई प्रतिष्ठानच्यावतीनं केलं जात आहे. यंदा प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या रंग महोत्सवात तब्बल १७०० वंचित मुलांनी सहभाग नोंदवला.

Bhoi Pratishthan
Ajit Pawar: "मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर...."; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

भोई प्रतिष्ठानच्या 'रंग बरसे' या महोत्सवाचं यंदाचं 27 वं वर्ष आहे. यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, अंध, अपंग मुलं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर पॉलीश करणारी मुलं, देवदासी भगिनींची मुलं, रस्त्यावर डोंबाऱ्यांचा खेळ करणारी मुलं, मतिमंद मुलं, ऊस तोडणी कामगारांची मुलं अशी वंचित घटकातील मुलं सहभागी होतात आणि आनंद लुटतात. अशा १७०० मुलांनी या महोत्सवाचा आनंद लुटला. रास्ता पेठेतील क्वार्टर गेटजवळील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या मैदानावर हा रंग महोत्सव पार पडला.

Bhoi Pratishthan
Ajit Pawar on CM Shinde: 'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं; म्हणाले, राग...

भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई म्हणाले, "यंद प्रतिष्ठानच्या रंग महोत्सवात आयोजन करण्यात आलं होतं. त्यात १,७०० विशेष मुलांनी सहभाग घेतला. खरं तर कोरोनाच्या काळात या मुलांना उत्सवाचा आनंद घेता आला नाही. यंदाच्या रंग महोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामध्ये सर्व घटकातील मुलं सहभागी झाले होते. तीन वर्षानंतर झालेल्या या रंग सोहळ्यात मुलं रंगात न्हाऊन गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अवर्णनीय असाच होता. रंग खेळताना ते हरखून गेल्याचे दिसून आले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ उपक्रमांतर्गत देखील मुलांशी संवाद साधण्यात आला. त्यांचा सहभाग ही एक महत्वाची गोष्ट होती"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com