भोमाळे घाटात दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

भोरगिरी - भोमाळे (ता. खेड) येथील घाटात अतिवृष्टीमुळे सोमवारी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला.

भोरगिरी - भोमाळे (ता. खेड) येथील घाटात अतिवृष्टीमुळे सोमवारी दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला.

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात रविवार आणि सोमवारी अतिवृष्टी झाली. खालचे भोमाळ्यावरून वरचे भोमाळ्याला जाण्यासाठी या वर्षी एक किलोमीटरचा नवीन घाटरस्ता तयार करण्यात आला आहे. रस्ता करताना डोंगराला दहा ते पंधरा फुटाचे उंचीपर्यंत खोदून कट मारण्यात आले आहेत. खोदलेला भाग मुरूम व मातीचा असल्याने पावसात खचून रस्त्यावर पडला. त्यामुळे रस्ता वाहतुकीला पूर्णपणे बंद झाला. वरचे भोमाळे येथे जाण्यासाठी धामणगाववरून आणखी एक मार्ग आहे. त्यामुळे गावचा संपर्क तुटला नाही. या घटनेत कुठलीही हानी नाही. सन १९९४ मध्ये खालचे भोमाळे येथे दरड कोसळली होती. तेव्हापासून हे गाव सरकारच्या धोकादायक गावांच्या यादीत आहे.

Web Title: Bhomale ghat landslide