भोरवासीयांनी घेतला कोरोनाचा धसका, शहरातील रस्ते रिकामे

विजय जाधव
मंगळवार, 14 जुलै 2020

भोर (पुणे) तालुका प्रशासनाबरोबर भोरवासीयांनीही पुण्यातील कडक लॉकडाऊचा आणि शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धसका घेतल्यामुळे मंगळवारी (ता.१४) शहरातील रस्त्यांवर सामसूम होती. मंगळवारी दिवसभर शहरातील जवळजवळ सर्वच रस्ते ओस पडले होते. औषधांची दुकाने आणि बॅंका वगळता शहरातील एकही दुकान किंवा कार्यालय उघडे नव्हते.

भोर (पुणे) - तालुका प्रशासनाबरोबर भोरवासीयांनीही पुण्यातील कडक लॉकडाऊचा आणि शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा धसका घेतल्यामुळे मंगळवारी (ता.१४) शहरातील रस्त्यांवर सामसूम होती. मंगळवारी दिवसभर शहरातील जवळजवळ सर्वच रस्ते ओस पडले होते. औषधांची दुकाने आणि बॅंका वगळता शहरातील एकही दुकान किंवा कार्यालय उघडे नव्हते. रस्त्यांवर सकाळी काही तुरळक प्रमाणात असलेली माणसेही दुपारी एकनंतर बंद झाली. बँकाही दुपारी एक वाजता बंद झाल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर स्मशानभूमीसारखी शांतता पसरली. केवळ नगरपालिका व पोलिसांच्या गस्त पथकाच्या गाड्याच फिरत होत्या. पुढील दहा दिवस शहरात अशाच प्रकारे शांतता राहण्याची मानसिकता भोरवासीयांची झालेली दिसत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा                   

शहरात सोमवारी (ता.१३) कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने शहरातील उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ८ झाली आहे. तर औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय मधील) कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाचे २१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर तालुक्यातील एकून ४३ कोरोनाग्रस्तांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. याशिवाय स्वँब घेण्यासाठी आणि घेतलेले परंतु अहवाल येणे बाकी असलेले १५ संशयीत रुग्ण अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वसतीसगृहात क्वारंटाईन आहेत.

अरे बापरे ! हवेली तालुक्याने गाठला हजाराचा टप्पा

कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांना स्वॅंब घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले जाते. परंतु सोमवारी पॉझिटीव्ह आढळलेले दोघेजण हे क्वारंटाईन कक्षातून कर्मचारी व पोलिसांची नजर चुकवून घरी गेले होते. मात्र त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनाने मंगळवारी त्यांना कोविड केअर कक्षात नेवून ठेवले. शासनाच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाणा-यांवर प्रशासन व पोलिसांमार्फत कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांवर आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या संशयीतांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात .येणार असल्याचेही तहसीलदार अजित पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhor City People CoronaVirus Road Empty