भोरचा पाणीपुरवठा 15 दिवसांनी सुरळीत 

tap
tap

भोर (पुणे) : गेल्या 15 दिवसांपासून विस्कळित असलेला भोर शहराचा पाणीपुरवठा सोमवारपासून (ता. 19) पूर्ववत सुरू झाला. 

भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणाजवळील दोन मोटारींपैकी 50 एचपीची एक मोटार मुसळधार पावसामुळे 4 ऑगस्ट रोजी नादुरुस्त झाली आणि पाइपलाइनही वाहून गेली. एक 90 एचपीची मोटार असलेल्या पाइपलाइनमधून आलेले पाणी शहराला पुरेसे नव्हते, त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता.

नगरपालिकेने कार्यवाही करून महावितरण आणि पाणीपुरवठा ठेकेदारांच्या मदतीने भोरेश्वर औद्योगिक वसाहतीमध्ये नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यावर 30 एचपी क्षमतेची मोटार बसवली, त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत केला.

आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते याचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे, चंद्रकांत मळेकर, अमित सागळे, जगदीश किरवे, कुणाल धुमाळ, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, संजय सोनवणे, किशोरी फणसेकर, प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

शुद्धीकरण केल्याने हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे नगराध्यक्षा आवारे यांनी सांगितले. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने नवीन सहा खांब उभे करून वीजजोड दिले, त्यामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, भोरचे उपअभियंता संतोष मोरे व शाखा अभियंता सचिन राऊत यांचे नगरपालिकेच्या वतीने आभार मानण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com