भोरमधील दुष्काळी गावांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नसरापूर - भोर तालुक्‍यातील महसूलच्या आठ मंडलांपैकी एकाच मंडलमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. इतर सात मंडलांच्या गावांतदेखील पाण्याची, पिकाची कठीण परिस्थिती असून, या तालुक्‍यातील इतर भागाचादेखील दुष्काळात समावेश करावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास 
व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

जानकर भोर तालुक्‍यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी तालुक्‍यातील किवत, गवडी, म्हाकोशी शिंद, नांद, महुडे खुर्द, महुडे बुद्रुक, भानसदरा अशा अनेक गावांना भेट दिली. यादरम्यान कापूरव्होळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. सध्या सरकारने शेतकऱ्यांची विजबिले माफ केली आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकार अनुदान देत असून, आतापर्यंत १५०० कोटी रुपये अनुदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचे रस्ते खूपच खराब आहेत, त्यासाठी जिल्हा परिषदेला जास्त निधी मिळावा, म्हणून प्रयत्न करणार असून, तालुक्‍यातील गडकिल्ले व पर्यटनासाठी पूरक वातावरण बघता पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी प्रांताधिकाऱ्यांना तालुक्‍याचा डीपीआर तयार करण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
या वेळी त्यांच्या समवेत भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी संतोष हराळे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक लढणार - जानकर
पत्रकारांनी या वेळी लोकसभा निवडणूक लढणारा आहात काय, असे विचारले असता, ‘हो मी लोकसभा निवडणूक लढणार असून, या भागाने माझ्यावर खूप प्रेम करून मोठे मतदान दिले आहे. त्यांचे प्रतिनिधीत्व करायला मला आवडेल,’ असे महादेव जानकर यांनी सांगितले. 

Web Title: Bhor Drought Village Watching Mahadev Jankar