भोर-महाड रस्ता आणखी 8 दिवस बंद

विजय जाधव
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसामुळे वरंध घाटात दरडी कोसळल्याने आणि रस्ता खचल्याने 4 ऑगस्टला बंद करण्यात आलेला भोर- महाड मार्ग अद्याप सुरू झालेला नाही. घाटातील दुरुस्तीचे काम झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. या कामास किमान आठ दिवस लागण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

भोर (पुणे) : मुसळधार पावसामुळे वरंध घाटात दरडी कोसळल्याने आणि रस्ता खचल्याने 4 ऑगस्टला बंद करण्यात आलेला भोर- महाड मार्ग अद्याप सुरू झालेला नाही. घाटातील दुरुस्तीचे काम झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. या कामास किमान आठ दिवस लागण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
वरंध घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या असून, एका ठिकाणी रस्ता खचला आहे. मागील दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यावरील धार मंडप येथेही रस्ता खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून वाहतूक करू नये, असे आवाहन भोर पोलिसांनी परिपत्रक काढून वाहनचालकांना केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhor-Mahad Road Close For 8 Days