काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

भोर - राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने नगरपालिकेच्या १५ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. दोन्ही पक्षांनी भोरची ग्रामदेवता समजल्या जाणाऱ्या वाघजाई मंदिरातून प्रचाराचा प्रारंभ केला. दोन्हीही पक्षांच्या प्रमुखांनी उमेदवारांना प्रचाराची रणनीती आखून नगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी (ता. २६) सायंकाळी; तर काँग्रेसने गुरुवारी (ता. २८) सकाळी प्रचाराचा प्रारंभ केला. राष्ट्रवादीचे गटनेते यशवंत डाळ यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे, जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, शहराध्यक्ष नितीन धारणे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शारदा डाळ, नगरसेवकपदाचे उमेदवार गौरी नेवसे, दत्तात्रेय भेलके, मेघा भेलके, यशवंत झांजले, सुमन शेळके, प्रशांत जाधव, मनीषा काळे, शंकर भिलारे, कल्पना शिंदे, नितीन धारणे, अनिता आंबिके, सुहीत जाधव, जयश्री तारू, धनंजय शिरवले, सविता मोहिते, रूपाली भेलके आदी उपस्थित होते.

काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर अभिजित भवन मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, महिलाध्यक्षा गीतांजली शेटे, विठ्ठल आवाळे, रोहन बाठे, दिलीप बाठे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निर्मला आवारे, नगरसेवकपदाचे उमेदवार पद्मिनी तारू, चंद्रकांत मळेकर, समीर सागळे, आशा रोमण, सचिन हर्णसकर, तृप्ती किरवे, रूपाली कांबळे, अमित सागळे, अमृता बहिरट, गणेश पवार, वृषाली घोरपडे, देविदास गायकवाड, सोनम मोहिते, अनिल पवार, स्नेहा पवार, आशा शिंदे व सुमंत शेटे आदी उपस्थित होते.

Web Title: Bhor municipal election Congress NCP campaign start