भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण करणारे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे: भोर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करणाऱ्या सहा जणांना आज (बुधवार) अटक करण्यात आली आहे.

भोर तहसीलदार कार्यालयाबाहेर सोमवारी (ता. 6) पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. खोत यांना मारहाण केल्याप्रकरणी गणेश वाडकर, महेश कोंडे, अमित कोंडे, प्रकाश धुमाळ, शुभम खुटवड व संदीप खुळे यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण शिवसैनिक आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांची पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांच्याशी सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास झटापट झाली होती.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांसोबत त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आले होते. अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर कोणासही येण्यास परवानगी नसते; परंतु पोलिसांनी बॅरिकेट्‌स त्या अंतराच्या आतच लावले होते. शिवाय पोलिस बंदोबस्तही पुरेसा नव्हता. त्यामुळे चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांनी स्वतः कार्यकर्त्यांना काठीने मारण्यास सुरवात केल्याने कार्यकर्त्यांची पळापळ झाली आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांच्याशी झटापट झाली होती.

Web Title: bhor: Six arrested for assault on a police inspector