भोरच्या मुली हुश्शार...बारावीच्या परीक्षेत तालुक्याचा निकाल ९१.७४ टक्के

bhor
bhor

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील इयत्ता बारावीचा निकालात गतवर्षीच्या निकालापेक्षा ६.८७ टक्यांनी वाढ झाली असून, यावर्षी बारावीचा तालुक्याचा निकाल ९१.७४ टक्के लागला आहे. तालुक्यातील २१ कनिष्ठ महाविद्यालयांपैकी ५ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय १० महाविद्यालयांचा निकाल ९० टक्यांपेक्षा जास्त लागला आहे. दरवर्षीप्रमाणे इंग्रजी मिडीयमच्या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.

भोर तालुक्यातील बारावीच्या परीक्षेस बसलेल्या २ हजार १०८ विद्यार्थ्यापैकी १ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक ९५९ विद्यार्थी श्रेणी १ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी २ मध्ये ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर २० विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे. या वर्षी तब्बल १३८ विद्यार्थ्यांना डिस्टींक्शन श्रेणी मिळाली आहे. तर, केवळ २० विद्यार्थ्याना पास श्रेणी मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बारावीच्या परिक्षेत मुलांपेक्षा मुलींच्या पासची टक्केवारी जास्तच आहे. या वर्षी मुलींची पासची टक्केवारी ९५.८९, तर मुलांची टक्केवारी ८६.७९ एवढी आहे. परीक्षेस बसलेल्या ९४९ मुलींपैकी ९१० मुली पास झाल्या, तर १ हजार २२६ मुलांपैकी १ हजार ६४ मुले पास झाली आहेत.

भोर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे व कंसात टक्केवारी- राजा रघुनाथराव कनिष्ठ महाविद्यालय भोर (९७.०६), छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय भोर (८५.९७), शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय नसरापूर (९६.४२), अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर (८१.५०), गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय भोर (९५.०८), महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय शिंदेवाडी (९२.५०), न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर (९६.४९), माध्यमिक विद्यालय व ज्यु. कॉलेज खानापूर (९६.०७), धाडवे पाटील कनिष्ठ महाविद्यालय सारोळे (९१.०८), जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय भोर (१००), अमृता विद्यालयम बनेश्वर (१००), काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे (१००), क्रांतीवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव (८१.३९), आपटी उच्च माध्यमिक विद्यालय (९५.७४), पसुरे उच्च माध्यमिक विद्यालय (८६.३६), युनिव्हर्सल कनिष्ठ महाविद्यालय (८०.००), राजगड़ ज्यु कॉलेज ऑफ सायन्स (१००).

व्यावसायीक अभ्यासक्रम विभाग कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे-  राजा रघुनाथराव कनिष्ठ महाविद्यालय भोर (८५.००), छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय भोर (८५.२९), शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय नसरापूर (८७.३०), अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर (९१.०७) आणि गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय भोर (१००).
  
Edited By : Nilesh J shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com