भोसरीतील गायरान हस्तांतरणाला गती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

भोसरी - भोसरीतील १६ गायरानांपैकी चार जमिनींचे हस्तांतरण झाले असून, लवकरच अन्य जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया मार्गी लागेल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत लांडगे यांनी बैठक घेतली. त्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

लांडगे म्हणाले, ‘‘गायरानांची देखभाल करण्यासाठी महापालिकेकडे जागा हस्तांतरण करण्याची गरज आहे. संबंधित गावे महापालिकेकडे समाविष्ट झाल्यापासून हा विषय प्रलंबित होता. यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.’’

काही जागा विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे हस्तांतर प्रक्रियेसाठी पाठवल्या असून, ती प्रक्रिया दीर्घ मुदतीची आहे. येत्या महिन्याभरात हे सर्व प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणावेत, अशा सूचनाही लांडगे यांनी या वेळी केली.

दिघी येथील सर्वे क्रमांक ४३ मधील गायरानावर संरक्षण विभागाने अतिक्रमण केले आहे. संबंधित अतिक्रमण काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या वेळी केली.

वडमुखवाडी येथील जागा नेमकी कोणाची, याचा मेळ नसल्यामुळे त्याबाबत महसूल मंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. या जागेमुळे पुणे-आळंदी रस्त्याचे काम रखडले आहे. तसेच, बोऱ्हाडेवाडी येथे पालिका शाळेसाठी आर्थिक तरतूद केली आहे. लवकरच जागेचे हस्तांतरण करून इमारत उभारणीचे काम हाती घेण्यात येईल. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 

Web Title: bhosari land transfer