इंद्रायणीनगरमधील विकास आराखड्यातील रस्ता अपूर्ण

संजय बेंडे
सोमवार, 25 जून 2018

भोसरी - इंद्रायणीनगरमधील तिरुपती चौक ते पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा विकास आराखड्यातील चोवीस मीटर रुंदीचा रस्ता १९९५ सालापासून रखडला आहे. त्यामुळे नागरिकांना भोसरीतून इंद्रायणीनगरमध्ये येण्यासाठी सद्‌गुरू पीएमपीएमएल डेपोसमोरील पर्यायी अरुंद रस्त्याचा वापर करावा लागत आहे. 

तथापि, रस्त्यासाठी आरक्षित जागा पालिकेच्या ताब्यात नसल्याने हा रस्ता रखडल्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. तरी, लवकरात लवकर जागेचा ताबा मिळवून रस्ता पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

भोसरीतून इंद्रायणीनगरकडे जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरून सद्‌गुरू डेपोसमोरून अरुंद पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे या डेपो चौकात वाहनांची नेहमीच गर्दी असते. याच मार्गावर डेपोतील बसगाड्यांचीही ये-जा असल्याने भरधाव वाहतूक असते. त्यामुळेच विकास आराखड्यातील हा रस्ता करावा, अशी नागरिकांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे. 

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विश्‍वेश्‍वर चौक ते तिरुपती बालाजी चौक रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. तिरुपती चौकापासून पुढे चारशे मीटर लांबीच्या रस्त्याचेही डांबरीकरण झाले आहे. मात्र, या भागातून पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या सुमारे अडीचशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. विशेषतः रस्त्यासाठी आरक्षित जागेत महामार्गालगत काही दुकानांचे अतिक्रमण वगळता संपूर्ण जागा मोकळी आहे. मात्र, पालिकेकडून जागा 

हस्तांतरासाठी योग्य पाठपुरावा होत नसल्यानेच पुढील विकास थांबला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विकास आराखड्यातील हा रस्ता झाल्यास सद्‌गुरू बस आगाराजवळील वाहतूक कोंडी सुटून भोसरी परिसरात ये-जा करण्यासाठी सोईस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे.

भोसरीतून इंद्रायणीनगरकडे जाणारा रस्ता तयार करणे गरजेचे असताना सुस्थितीत असलेल्याच रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटी रुपये खर्चाचा घाट महापालिकेने घातला आहे. २०१३ पासून या रस्त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, पालिकेकडून भूसंपादन होत नाही. पालिकेने हा रस्ता तातडीने तयार करणे गरजेचे आहे.
- ॲड. नितीन लांडगे, नगरसेवक 

 भूसंपादनासाठी जागामालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. जागेच्या हस्तांतरासाठीचे संमती पत्रकही भरून देण्याचे आवाहन जागामालकांना करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. जागेच्या हस्तांतरासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
-श्‍याम गर्जे, कनिष्ठ अभियंता, नगररचना विभाग 

Web Title: bhosari news indrayaninagar The road in the development plan is incomplete