मोकळ्या भूखंडांची कचराकुंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

भोसरी - इंद्रायणीनगरातील प्राधिकरणाच्या भूखंडांवर नागरिक राडारोडा व कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. काहीजण घरबांधणीनंतर उरलेला राडारोडा टाकतात. काही लघुउद्योजक कारखान्यातील टाकाऊ पदार्थ टाकतात. त्यामुळे इंद्रायणीनगरातील मोकळे भूखंड कचरा कुंडी झाले आहेत.

उपाययोजना
 परिसरात घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणे
 राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे
 नागरिकांमध्ये जनजागृती करणे
 कचरा उचलण्यासाठीच्या मनुष्यबळात वाढ करणे

भोसरी - इंद्रायणीनगरातील प्राधिकरणाच्या भूखंडांवर नागरिक राडारोडा व कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. काहीजण घरबांधणीनंतर उरलेला राडारोडा टाकतात. काही लघुउद्योजक कारखान्यातील टाकाऊ पदार्थ टाकतात. त्यामुळे इंद्रायणीनगरातील मोकळे भूखंड कचरा कुंडी झाले आहेत.

उपाययोजना
 परिसरात घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणे
 राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे
 नागरिकांमध्ये जनजागृती करणे
 कचरा उचलण्यासाठीच्या मनुष्यबळात वाढ करणे

ही आहेत ठिकाणे
    पेठ क्रमांक एक - नियोजित जलतरण तलावाशेजारी, सूर्यदीप सोसायटीलगत, राणी पुतळाबाई विधी महाविद्यालजवळ, संकल्प सोसायटीलगत
    पेठ क्रमांक दोन - पोलिस वसाहतीपाठीमागे, दवाखान्याचा आरक्षित भूखंड
    पेठ क्रमांक सात - लक्ष्मी कॉम्प्लेक्‍स पाठीमागील भूखंड
    पेठ क्रमांक दहा - हॉकी मैदानाजवळील मोकळा भूखंड

येथेही टाकला जातो कचरा
 पेठ क्रमांक दोनमधील बिल्डिंग क्रमांक ४८ समोर
    पेठ क्रमांक चार, संतनगर केंद्रीय विहाराच्या पाठीमागे
    पेठ क्रमांक एकमधील चैतन्य पार्कजवळील रस्ता, जिल्हा मध्यवर्ती सुविधा केंद्रालगतचा रस्ता, उषाकिरण हॉटेललगतचा रस्ता, पेठ क्रमांक सातमधील यशवंतराव चव्हाण चौक
    पेठ क्रमांक दोन येथील महावितरणच्या रोहित्राजवळील संरक्षक जाळीच्या आत, महाराष्ट्र कॉलनी, राजवाडा दत्तमंदिर, हनुमान मंदिराजवळ

इंद्रायणीनगर परिसरातील मोकळ्या भूखंडाचे सर्वेक्षण करणार असून, कचरा टाकला जात असल्यास तो पालिकाद्वारे काढण्यात येईल. तसेच राडारोडा असल्यास तो काढण्यासाठी पालिकेच्या स्थापत्य विभागाला सांगितले जाईल. 
- बाबासाहेब कांबळे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

चैतन्य पार्कजवळील मोकळ्या भूखंडातील झाडाची फांदी आमच्या प्लॉटवर आली आहे. या झाडाच्या फांदीवरून साप व उंदीर घरामध्ये येतात. आतापर्यंत चार वेळा साप घरात आला आहे. 
- पांडुरंग विश्वनाथ जराड, रहिवासी, चैतन्य पार्क

संकल्प हाउसिंग सोसायटीने केलेल्या कामानंतर राडारोडा तसाच टाकला. मोकळ्या जागेत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रास होतो.
- माया सैनी, रहिवासी, चेतक हाउसिंग सोसायटी

राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व भरारी पथकाचीही नेमणूक करावी. कचरा उचलण्यासाठी पालिकेने जादा मनुष्यबळ उपलब्ध केले पाहिजे.
- संजय वाबळे, नगरसेवक

Web Title: bhosari news land garbage