चोरीच्या २० दुचाकी पकडल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५५ हजारांच्या २० दुचाकी हस्तगत केल्या.

पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५५ हजारांच्या २० दुचाकी हस्तगत केल्या.

रामेश्‍वर विलास खंदारे (वय २५, रा. भोसरी), अनिल तबा काळे (वय २१, रा. भोसरमाळ, कन्हेर, पो. पोखरी ता. पारनेर, जि. नगर), अविनाश वामन मध्ये (वय १९, रा. म्हसोबाझाप, पो. पोखरी, ता. पारनेर, जि. नगर), ओंकार रमेश चव्हाण (वय १९, रा. आळंदी), रामेश्‍वर परमेश्‍वर भिसे (वय २१, रा. मरकळ, आळंदी) अशी त्यांची नावे आहेत. सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंदारे याच्याकडून चार, काळे आणि मधे यांच्याकडून आठ तर चव्हाण आणि भिसे यांच्याकडून आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या २० दुचाकींपैकी १२ दुचाकींचे मालक शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित आठ दुचाकींच्या मालकांचा शोध घेणे सुरू आहे. चोरलेल्या दुचाकींची कागदपत्रे नंतर देतो, असे सांगत त्यांची विक्री ग्रामीण भागात अल्प किमतीत करीत असे. आरोपींनी आतापर्यंत भोसरी, दिघी, विश्रांतवाडी, पारनेर, जुन्नर, आळेफाटा, शिरूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केली. उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, काळुराम लांडगे, विवेक श्रीसुंदर, गणेश हिंगे, समीर रासकर, प्रवीण पाटील, गणेश सावंत, सुधीर डोळस, नितीन खेसे, संतोष महाडीक, बाळासाहेब विधाते, सागर भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Bhosari police arrested five people who stole two-wheelers