लांडगे तलाव समस्यांच्या गर्तेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

भोसरी - येथील बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्राला चोरीस गेलेले शॉवर, तुटलेल्या फरशा, प्रथमोपचार पेटीचा अभाव, लाइफ गार्डची कमतरता, नादुरुस्त पंप, खांबावरील गायब दिवे आदी समस्यांनी ग्रासले आहे. तुटलेल्या फरशा आणि जाळ्यांचा पोहण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.

भोसरी - येथील बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्राला चोरीस गेलेले शॉवर, तुटलेल्या फरशा, प्रथमोपचार पेटीचा अभाव, लाइफ गार्डची कमतरता, नादुरुस्त पंप, खांबावरील गायब दिवे आदी समस्यांनी ग्रासले आहे. तुटलेल्या फरशा आणि जाळ्यांचा पोहण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे.

भोसरीतील सर्व्हे क्रमांक एकमधील महापालिकेचा लांडगे जलतरण तलाव सहा महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद होते. गेल्या आठवड्यातच तो सुरू केला आहे. मात्र अद्यापही काही फरशा तुटलेल्या असल्याने नागरिकांना इजा होत आहे. तसेच, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधलेल्या गटारावरील जाळ्या तुटल्या आहेत. त्यात पाय अडकून दुखापत होत आहे.

स्नानगृहातील समस्या
    महिला : विद्युत दिवे नाहीत, शॉवर गायब, भिंतीवर कोळ्यांच्या जाळ्या
    पुरुष :  काही शॉवर बंद, विजेच्या तारा धोकादायक
    महिला स्वच्छतागृह :  विद्युत दिवे नाहीत, पुरुष, मुलेही प्रवेश करतात

जलतरण तलाव
    तळाकडील काही फरशा तुटलेल्या
    पंप नादुरुस्त
    खांबांवरील विद्युत दिवे बंद
    काही खांबावर विद्युतचे काम, मात्र जुनेच दिवे लावले

गटारांची अवस्‍था
    जाळ्या निखळलेल्या 
    जागोजागी तुटलेल्या आहेत

असुविधा
    प्रथमोपचार पेटी नाही
    लाइफ गार्डचा अभाव 
    थर्माकोलच्या बॉक्‍सला कापड बांधून लाइफजॅकेट म्हणून वापर

तलाव बंद ठेवण्याचे कारण
जलतरण तलावातील पंपाच्या 
केसिंगला भोके पडल्याने पाण्याच्या फिल्टरेशन आणि सक्‍शनच्या क्रिया संथ गतीने होतात. कधीकधी पंपच 
बंद पडत असल्याने पाण्याचे 
फिल्टरेशन आणि सक्‍शन थांबते. त्यामुळे तलाव नागरिकांसाठी बंद ठेवावा लागतो.

जलतरण तलावातील विद्युतची सर्व कामे संबंधित ठेकेदारांनी करावयाची आहेत. तसा करारनामा जलतरण तलाव चालविण्यास देताना करण्यात आला आहे.
- प्रवीण घोडे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग

चार महिन्यांपूर्वीच जलतरण तलावातील सर्व दुरुस्त्या स्थापत्य विभागाद्वारे केल्या आहेत. क्रीडा विभागाद्वारे विनंती आल्यास महिला स्नानगृहात शॉवर बसविण्यात येतील.
- विवेक ताकवले, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग

तलावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रथमोपचार पेटीचा अभाव आहे. त्यामुळे दुखापत झाल्यास उपचार उपलब्ध होत नाही.
- एक नागरिक

तलावातील मोटारी जुन्या झाल्याने पंपावरील झाकणे होल पडले आहेत. नवीन पंप देण्यासाठीचे प्रशासनाला पत्र दिले आहे. प्रथमोपचार पेटीही महापालिकेच्या रुग्णालयातून आणण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत.
- अशोक पटेकर, पर्यवेक्षक, जलतरण तलाव

Web Title: bhosari pune news landage swimming tank issue