भोसरीत वाहनांची पुन्हा तोडफोड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पिंपरी : भोसरीतील आदिनाथनगर परिसरातील आठ वाहनांच्या तोडफोडीची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. आठवडाभरातील या भागातील वाहनांच्या तोडफोडीची ही दुसरी घटना आहे. येथील काही नागरिकांनी सेकंडशिपवरून आल्यावर रात्री बाराच्या सुमारास वाहने पार्क केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्री कोणीतरी येथील आठ वाहनांच्या काचा फोडल्या.

परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. आरोपींना लवकरच शोधून काढू, असे पोलिसांनी सांगितले. चिखली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून 16 जणांच्या टोळक्‍याने याच आठवड्यात 17 वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणातील काही जणांना पोलिसांनी अटकही केली. 

कारवाईची मागणी 
ज्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या आहेत, ते या घटनेबाबत बोलण्यास तयार नाहीत. मात्र, पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Bhosari vehicles reopen